धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला एकाची हत्या
Breaking News | Jalna Crime News : एका 45 वर्षीय व्यक्तीवर तलवारीने हल्ला करुन हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडली.

Breaking News | जालना: शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील नूतन वसाहत भागात एका 45 वर्षीय व्यक्तीवर तलवारीने हल्ला करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब सोमधाने असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाबासाहेब सोमधाने हे भाजीपाला घेत असताना चारचाकी वाहनात आलेल्या तीन जणांकडून भर बाजारात तलवारीने त्यांच्या हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी लगेच या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. जुना वाद आणि जमिनीच्या व्यवहारातून हा वाद झाल्याने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमकं हत्या करण्याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, अचानक चारचाकी गाडीतून तीन जणांना येऊन बाबासाहेब सोमधाने यांच्यावर तलावारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेमुळं जालना शहरात खळबळ उडाली आहे.
Breaking News: One killed in sword attack at Bhar Bazaar while buying vegetables


















































