Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कानशिलात मारल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

अहिल्यानगर: कानशिलात मारल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Crime: ४५ वर्षीय अनोळखी पुरुष रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत आढळून आला.

One person died after being hit in the ear

शिर्डी : नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्सजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध करणाऱ्या व्यक्तीला कानशिलात चापट मारल्याने तो पाठीमागे डोक्यावर पडून जागीच मृत्युमुखी पडला. ही घटना रात्री गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाच्या निदर्शनास आली.

हमसफर ट्रॅव्हल्ससमोर एक अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुष रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत आढळून आला. रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ओळखून अवघ्या काही तासांत पोलिसांनी किरण काळे (रा. नांदूर-शिंगोटे), विजय जाधव (रा. निमगाव) आणि ऋषिकेश अंधारे (रा. गंगापूर, हिंगोली) यांना अटक केली.

या तिघांविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, तो स्थलांतरित मजूर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Breaking News: One person died after being hit in the ear

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here