Home अकोले वाहतूक नियंत्रणासाठी भंडारदरा परिसरात 15 ऑगस्ट पासून एकेरी वाहतूक, असा असणार मार्ग

वाहतूक नियंत्रणासाठी भंडारदरा परिसरात 15 ऑगस्ट पासून एकेरी वाहतूक, असा असणार मार्ग

Breaking News | Bhandardara Road: 15 ऑगस्ट व सलग सुट्ट्यांची गर्दी लक्षात घेऊन भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तीन दिवस एकेरी वाहतुक करण्याचे आदेश.

One-way traffic in Bhandardara area from August 15 for traffic control

अकोले:  15 ऑगस्ट व सलग सुट्ट्यांची गर्दी लक्षात घेऊन भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तीन दिवस एकेरी वाहतुक करण्याचे आदेश दिले आहेत

राजुर पोलीस स्टेशन हद्दीत भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरीशचंद्रगड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, वाल्मीक ऋषीं आश्रम कोदणी अशी प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर पुणे, नाशिक, ठाणे-मुंबई व आसपासचे तालुक्यातील संगमनेर, अकोले, श्रीरामपुर, ईगतपुरी व ईतर महत्त्वाच्या शहरातील पर्यटक यांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. तसेच दिनांक १५/०८/२०२५ ते दिनांक १७/०८/२०२५ अशी ०३ दिवस सुट्टी असल्याने सदर दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

सदर भागातील रस्ते हे अरुंद असुन काही रस्त्यांचे दुरुस्तीचे काम चालु आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिनांक १५/०८/२०२५ ते दिनांक १७/०८/२०२५ अशी ०३ दिवस सकाळी ०७.०० ते रात्री २०.०० पोवेतो शेंडी भंडारदरा येथील वाहतुक एकेरी करणे आवश्यक असल्याने अहिल्यानगर चे पोलीस अधीक्षक,सोमनाथ घार्गे, यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन दि. १५/०८/२०२५ ते दि. १७/०८/२०२५ रोजीचे सकाळी ०७.०० ते रात्री २०.०० वा. पावेतो शेंडी -भंडारदरा या मार्गावरील वाहतुक बंद करून खालील पर्यायी मार्गाने एकेरी करणेबाबतचा आदेश दिला

१) रंधा फाटा येथुन भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद.

२) शेंडी / भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथुन प्रवेश.

३) एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा / वाकी फाटा (प्रवेश) चिंचोडीफाटा यश रिसोर्ट शेंडी भंडारदरा धरण

स्पिल्वे गेट भंडारदरा गाव -गुहीरे रंधा (बाहेर)

Breaking News: One-way traffic in Bhandardara area from August 15 for traffic control

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here