Home अहिल्यानगर अहिल्यानगर: तरुणाकडून मुलीची छेडछाड; पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर: तरुणाकडून मुलीची छेडछाड; पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल

Breaking News | Ahilyanagar Crime: एका अल्पवयीन मुलीला हातवारे करून पाठलाग करणाऱ्या आरोपीवर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

young man molested a girl; a case of POCSO and molestation was registered

राहुरी:  राहुरी शहरातील एका अल्पवयीन मुलीला हातवारे करून पाठलाग करणाऱ्या आरोपीवर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी घरासमोर भांडे घासत असताना आरोपी तरुण पीडित मुलीला अश्लील इशारे करून हसत होता. पीडित मुलीचे नातेवाईक आरोपीला समजावून सांगत असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी अमजद अहमद शेख, रा. तनपुरेवाडी रोड, राहुरी, याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५१ (२), ३५२ सह पोस्को कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. वाघमारे हे करीत आहेत.

अल्पवयीन मुलगी पसार

श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथे मोटारसायकलवरून फिरण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी पसार झाली आहे. अल्पवयीन मुलगी सकाळी वडिलांना विचारून मोटारसायकल घेऊन गेली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी खंडाळा गावात शोध घेतला. मात्र, मुलगी मिळून आली नाही. गावातील एक मुलगा हा मुलीच्या सतत संपर्कात होता. त्यांना फोनवर बोलताना पाहिले होते. त्याने मुलीला पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.

Breaking News: young man molested a girl; a case of POCSO and molestation was registered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here