Home संगमनेर संगमनेरची जनताच जायंट किलर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जनसागर उसळला

संगमनेरची जनताच जायंट किलर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जनसागर उसळला

Breaking News | Sangamner | Eknath Shinde: तुमच्या समोर नतमस्तक होण्यासाठी आलोय. अमोल खताळ जरी जायंट किलर ठरला, पण खरे जायंट किलर जनता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

people of Sangamner are the giant killers, Deputy Chief Minister Eknath Shinde, the ocean of people rose up

संगमनेर: संगमनेरच्या इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहावा असा हा आजचा दिवस आहे. एवढा मोठा जनसागर लोटला आहे. हे भगवं वादळ पाहायला मिळालं. कारण, विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवला आणि चाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळेच तुमच्या समोर नतमस्तक होण्यासाठी आलोय. अमोल खताळ जरी जायंट किलर ठरला, पण खरे जायंट किलर जनता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महायुतीचा महाविजय मेळावा आणि आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.24) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ठिकठिकाणी जेसीबीने पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तर त्यांनीही जनतेला हात दाखवून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील जाणता राजा मैदानावर झालेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी आमदार अमोल खताळ, नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांसह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शहरात गटारीचे काम करताना मयत झालेल्या अतुल पवारच्या कुटुंबियांना वीस लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रत्यक्ष नाव न घेता कठोर शब्दांत टीका केली. हे स्वागत, प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. कुणालाही येथे भाड्याने आणलेलं नाही, सर्वजण प्रेमापोटी आले आहे. खर्‍याअर्थाने येथे लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी यांचा संगम पाहायला मिळाला. आमदार अमोल खताळला खबर्‍या म्हणणार्‍यांच्या हातात आपण खुळखुळा दिला आहे. त्यांनी तो वाजवावा, नवीन आमदार कामाच्या माध्यमातून सगळ्यांची खबर बनेल. या निकालामुळे संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहित पडला. निराधारांना आधार देण्याचं काम केलं म्हणून संधीचं सोनं करणारा आमदार म्हणजे अमोल खताळ अशी ओळख तयार झाली. लोकसभेला फेक नरेटिव्ह पसरवून यश मिळवलं. मात्र विधानसभेत लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलं.

या योजनेत खोडा घालणार्‍यांना जोडा दाखवा म्हटल्यावर बहिणींनी 232 नंबरचा जोडाच त्यांना मारला. तेव्हा विरोधक काहीही म्हणाले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आमचं सरकार दिलेला शब्द पाळणारं आहे.

माजी मंत्री थोरातांवर टीका करताना म्हणाले, साखर कारखाना, दूध संघ, महाविद्यालये त्यांची मग दूध त्यांचं, चहा त्यांचा, बिस्कीट त्यांचं, मलाई त्यांची मग जनतेला काय धतुरा? असा तिखट सवाल करत आपला माणूस सेवावाला आहे मेवावाला नाही. आता विरोधकांनी वोटचोरीचा आरोप केला पण, खरेतर त्यांचा मेंदू चोरीला गेला आहे. पहलगाम हल्ल्याला पतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर व महादेव करून अतिरेक्यांचा खात्मा केला. परंतु, विरोधक पाकिस्तानची बोली बोलताय ही त्यांची देशभक्ती आहे का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चांगलीच टीका केली.

वारकर्‍यांवर हल्ला करतात हे कसलं हिंदुत्व असा प्रतिसवाल करुन त्यांच्या केसालाही धक्का लावायची हिंमत कोणी करू नये असा इशारा दिला. आपलं सर्वसमान्य जनतेचं सरकार असून शेतकरी कर्जमाफी देखील करणार आहे असा विश्वास देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील सर्वजण तुमच्या पाठिशी असून, जनतेने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभार मानले. आमदार खताळ म्हणाले, सत्यजीत तांबे म्हणतायेत ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. परंतु, फोटो काढून व्हायरल केले म्हणजे सत्ताधारी होत नाही. त्याला पक्षाच्या चिन्हावर निवडून यावं लागतं. आता संगमनेर शहर व तालुक्यात कुणाचीही दहशत राहिली नाही. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भगवा फडकवायचा आहे, असा विश्वासही व्यक्त केला. सभेच्या प्रारंभी राज्यगीत तर शेवटी राष्ट्रगीत झाले.

पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार…

संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी वाढीव जागा, स्वतंत्र बालरोग व महिला रुग्णालय, एमआयडीसी व आरटीओ प्रादेशिक कार्यालय, जल शुद्धीकरण प्रकल्प करण्याबाबतच्या प्रक्रियेला संबंधित मंत्र्यांना तत्काळ सूचना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करुन नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची पारदर्शकपणे चौकशी करणार असल्याचेही सांगितले.

Breaking News: people of Sangamner are the giant killers, Deputy Chief Minister Eknath Shinde, the ocean of people rose up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here