अहिल्यानगर: अत्याचार करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Breaking News | Ahilyanagar Crime: २०२३ पासून तो मानसिक दबाय टाकत होता. ती अल्पवयीन असूनही त्याने संबंध प्रस्थापित केले.
अहिल्यानगर: नेवासा तालुक्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिचे सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुरेश कुटे (रा. देडगाव, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची, तसेच तिचे अश्लील फोटो मोबाइलमध्ये काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने तिचे ठरलेले लग्न मोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात सागर सुरेश कुटे ( देडगाव, ता. नेवासा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने २४ एप्रिल रोजी रात्री फिर्याद दिली आहे.
आरोपी सागर कुटे हा एप्रिल २०२३ पासून तिच्यावर घरी येऊन मानसिक दबाव टाकत होता. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने मोबाइलमध्ये तिथे अश्लील फोटो काढले होते. यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये सागरने तिला सावेडी येथील एका लॉजवर नेऊन पुन्हा धमकी देत फोटो काढले. हेच फोटो नंतर त्याने फिर्यादीला व्हॉटसअॅपवर पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या आई-वडील व भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या सर्व प्रकारानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो तिचे लग्न ठरलेल्या तरुणाच्या इन्स्टाग्रामवर पाठवले. यामुळे त्या तरुणाचे जमलेले लग्न मोडले. यानंतर पीडितीने नातेवाईकांसह नगर तालुका पोलिस ठाण्यात २४ एप्रिल रोजी तक्रार दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ई.बी. आव्हाड करत आहेत. आरोपी सागर कुटे पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Breaking News: Photos of abused go viral on social media