Home अहिल्यानगर अहिल्यानगर पोलीस दलात खळबळ! पोलीस कॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

अहिल्यानगर पोलीस दलात खळबळ! पोलीस कॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

Breaking News | Ahilyanagar Bribe: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज (१२ ऑगस्ट) यशस्वी सापळा कारवाई करून एका पोलीस कॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

Police constable caught red-handed accepting bribe

श्रीगोंदा, अहिल्यानगरः श्रीगोंदा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज (१२ ऑगस्ट) यशस्वी सापळा कारवाई करून एका पोलीस कॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आरोपीचे नाव संभाजी शिवाजी घोडे (वय ३२, व्यवसाय – नोकरी, पोलीस कॉन्स्टेबल, रा. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर) असे असून, त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

३२ वर्षीय महिला तक्रारदार आपल्या कुटुंबासह श्रीगोंद्यात राहतात. त्यांच्या मुलाविरुद्ध स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल झाला होता. त्यानंतर आरोपी कॉन्स्टेबल घोडे यांनी तक्रारदारांच्या मुलाला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले व प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा केला. तसेच, ‘तुमच्या मुलावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही, मोबाईल परत हवा असेल तर २०,००० रुपये द्या अशी लाचेची मागणी केली. शेवटी तोडजोडीअंती ३,००० रुपयांची मागणी करण्यात आली.

तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ACB, अहिल्यानगर येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार ११ व १२ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपीने पंचांच्या उपस्थितीत ३,००० रुपयांची मागणी व स्वीकार करण्याची तयारी दर्शवली.

आज (१२ ऑगस्ट) सापळा रचून आरोपी घोडे यांनी तक्रारदारांकडून स्वतः ३,००० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना जागीच अटक करण्यात आली. लाच रक्कम व हॅश व्हॅल्यू जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे, बाबासाहेब कराड, वैभव सुपेकर, चालक पोलीस हवालदार हारून शेख, लाड (सर्व ACB अहिल्यानगर) यांचा समावेश होता. मार्गदर्शक म्हणून मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र आणि मा. माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र यांनी मार्गदर्शन केले.

Breaking News: Police constable caught red-handed accepting bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here