Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

अहिल्यानगर: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

Breaking News | Ahilyanagar: शासकीय कामासाठी प्रवास करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना.

Police officer beaten up

श्रीरामपूर : शासकीय कामासाठी प्रवास करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

शहर ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी सचिन रूपचंद दुकने यांना संकेत राजनाथ यादव व सर्वेश राजनाथ यादव या दोन आरोपींनी प्रथम बसस्थानक येथे वाद घालून त्रास दिला. या वादानंतर दोघांनी नेवासा रोडवरील पुलाजवळ बस अडवून दुकने यांना बसमधून खाली उतरविले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुकने यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

 त्यांच्या आदेशावरून पोलिस पथक घटनास्थळी धाव घेतली आणि त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.

घटनेनंतर पोलिस दलात संतापाची भावना व्यक्त होत असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिस प्रशासनानेदेखील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेने पोलिस दलाच्या प्रतिष्ठेला आव्हान देणाऱ्या घटनांबाबत अधिक तीव्रपणे दखल घेण्याची गरज आहे.

Breaking News: Police officer beaten up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here