पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Pune Suicide: पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
पुणे शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सचिन हरीशचंद्र सुर्वे (वय 46) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन सुर्व्हे खडक पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली होती. पत्नी व मुलीसह ते शिवाजीनगर पोलीस वसाहतीत नवीन शिवनेरी बिल्डिंग येथे राहात होते. दरम्यान दोन दिवसापासून घरी एकटेच होते. पत्नी व मुलगी माहेरी गेली होती. शुक्रवारी दुपारी सचिन यांनी राहत्या घरात गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
Breaking News: Police officer commits suicide by hanging