Home अहिल्यानगर अहिल्यानगर: लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसाय रँकेटचा पर्दाफाश

अहिल्यानगर: लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसाय रँकेटचा पर्दाफाश

Breaking News | Ahilyanagar Raid: शहरातील एका लॉजवर अनाधिकृत वेश्याव्यवसाय करणार्‍या रँकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश. तीन महिलांची सुटका.

Police raid lodge, uncover prostitution racket

श्रीरामपूर: शहरातील एका लॉजवर अनाधिकृत वेश्याव्यवसाय करणार्‍या रँकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याठिकाणाहुन दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. काल पोलीस उपाधिक्षक जयदत्त भवर यांना शहरातील आदर्श लॉज येथे अनाधिकृतरित्या वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहीती मिळाली. त्यांना मिळालेल्या माहीतीवरुन शहर पोलिसांनी आदर्श लॉज येथे जाऊन छापा टाकला. सदर ठिकाणी धिरज प्रमोद बिंगले (वय 35, रा. रंगोलीगल्ली वार्ड नं.5, श्रीरामपूर) व त्याचा मॅनेजर अहमद शेख हे स्वतः आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडत असल्याचे निदर्शनास आले.

सदर कारवाई मध्ये तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी धिरज प्रमोद बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख (रा. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द स्त्रीयांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धिरज प्रमोद बिंगले यास अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहेत.

Breaking News: Police raid lodge, uncover prostitution racket

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here