कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; दोन महिलांची सुटका
Breaking News | Jalna Crime: कारवाई : दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जालना : जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली. दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात दोन महिलांसह तिघांविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन महिला इतर महिलांना ठेवून कुंटणखाना चालवित असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्या माहितीवरून पथकाने शुक्रवारी सायंकाळी कुंटणखान्यावर धाड टाकली.
दोन महिलांची सुटका करण्यात आली. तर ग्राहक असलेल्या राहुल हरी सुरासे (वय २६, रा. पिंपळगाव कड, ता. जाफराबाद) याच्यासह दोन महिलांविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे, पोउपनि रवींद्र जोशी, पोउपनि संजय गवळी, अंमलदार कृष्णा देठे, संगीता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड, अंमलदार संजय कुलकर्णी यांच्या पथकाने केली. दरम्यान, पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अंबटशौकिनांचे धाबे दणाणले आहेत.
Breaking News: Police raid on a brothel two women rescued