Home पुणे बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, आतमध्ये शिरताच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, आतमध्ये शिरताच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Breaking News | Pune Crime: स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची खळबळजनक घटना.

Police raids massage parlor and prostitute business exposed

पुणे: पुण्यातील एका प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात हा प्रकार घडला. बाणेरच्या बालेवाडी फाटा परिसरात ‘वेदा स्पा’ सेंटरविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतो, असे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बाणेर परिसरातील मसाज पार्लर आणि वेदा स्पा सेंटरवर छापा टाकला.

पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून याठिकाणी देहविक्रय सुरु असल्याची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लर चालक ज्योतीदेवी देवनारायण घोष (३८, रा. गहुंजे), अमनगिरी गोस्वामी (२३, रा. मुकाई चौक, रावेत) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोष आणि गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अहमद अली (वय 22) आणि मसाज पार्लर चालवणारी महिला आणि जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Breaking News: Police raids massage parlor and prostitute business exposed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here