गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच
Breaking News | Ahilyanagar: गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर पोलिसांची नजर राहणार आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा.
अहिल्यानगर: गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर पोलिसांची नजर राहणार आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
पोलिस महानिरीक्षक कराळे अहिल्यानगर दौऱ्यावर आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. विशेषतः सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी
गणेश मंडळांनी किमान चार सीसीटीव्ही बसवावेत
गणेश मंडळांना सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही आहेत. परंतु, गणेश मंडळांनीही सीसीटीव्ही बसविणे अपेक्षित आहे. किमान चार सीसीटीव्ही बसवावेत. मंडळांना भेटी देऊन सीसीटीव्ही बसविण्याबाबत सूचना केल्या जाणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.
सेलची स्थापना करण्यात आली आहे. डीजेवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. तसेच डीजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. ढगणेशोत्सव काळात उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या ४०० लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार आहेत. तसेच काहींना तडीपार केले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस सज्ज आहेत. जिल्ह्यातील पोलिस दल वाढविण्यात येणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.
Breaking News: Police watch on social media during Ganeshotsav