Home अहिल्यानगर अहिल्यानगर: लाचप्रकरणी पोलिसासह राजकीय पक्षाचा नेता जाळ्यात

अहिल्यानगर: लाचप्रकरणी पोलिसासह राजकीय पक्षाचा नेता जाळ्यात

Breaking News | Ahilyanagar Bribe: त्यात राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा सहभाग असल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.

Policeman, political party leader caught in bribery case

अहिल्यानगर : लाच मागितल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यासह राजकीय पक्षाच्या नेत्याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दोघांना पोलिसांनी गुरुवारी रात्री येथील शासकीय विश्रामगृहात नेले. तिथे दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. नाशिक येथील पथक गुरुवारी दिवसभर या दोघांच्या पाळतीवर होते. पथकाने पोलिस व राजकीय नेत्याला सावेडी उपनगरातील रुग्णालयासमोरून ताब्यात घेतले आहे. त्यात राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा सहभाग असल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

Breaking News: Policeman, political party leader caught in bribery case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here