एआयचा वापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ
Breaking News | Satara Crime: एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ तयार केले गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली.
सातारा: एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कोण काय करेल याचा नेम राहिला नाही. एकीकडे चांगल्या गोष्टींसाठी एआयचा वापर केला जातो तर दुसरीकडे एआयचा वापर करून अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले जातात. या एआय तंत्रज्ञानाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी बळी पडले. तसंच या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील केली जात आहे. साताऱ्यामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ तयार केले गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका तरुण-तरुणीचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले. हे व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे व्हिडीओ समोर येताच या डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार स्वतला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्यांची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना समोर येताच साताऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
Breaking News: Pornographic photos and videos of female doctors using AI