Home औरंगाबाद पोस्टमन असलेल्या पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा खून

पोस्टमन असलेल्या पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा खून

Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: मध्यरात्री पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून.

Postman husband kills wife by stabbing her with a sharp weapon

वैजापूर : तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील खंडाळा येथे युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, मध्यरात्री पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील राहेगाव येथे १५ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अनिता चांगदेव शेलार (५५, राहेगाव ता. वैजापूर) असे घटनेतील मृत महिलेचे नाव असून चांगदेव रामराव शेलार (५७, राहेगाव) असे मारेकरी पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील मृत अनिता शेलार या अंगणवाडी सेविका होत्या तर त्यांचा पती चांगदेव शेलार हा पोस्टमन आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून दोन्ही मुलींचे व मुलाचे देखील लग्न झालेले आहे. १४ जून रोजी सायंकाळी अनिता यांचा पती चांगदेव शेलार हा पंढरपूरहून घरी परतला होता. या दिवशी त्यांचा मुलगा घरी नव्हता तर त्यांची सून देखील माहेरहून सासरी परत आली. दरम्यान मध्यरात्री चांगदेव शेलार याने धारदार शस्त्राने अनिता यांच्या चेहऱ्यावर व मानेवर कोयत्याने सपासप वार केले. ही घटना समजताच नातलगांनी अनिता यांना रक्तबंबाळ अवस्थेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान घटना घडताच चांगदेव याने विहिरीत उडी घेण्याचा प्रयत्न केल्याची परिसरात चर्चा होती. यानंतर चांगदेव याने घटनास्थळाहुन धूम ठोकली. रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस हवालदार योगेश झाल्टे, सीमा जाधव इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Breaking News: Postman husband kills wife by stabbing her with a sharp weapon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here