लॉजवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, 4 क्रिकेटपटूंसोबत 2 तरुणी आढळल्या नको त्या अवस्थेत
Breaking News | prostitution racket bust: लॉजवर छापेमारी केली. यावेळी पोलिसांना लॉजमध्ये ४ क्रिकेटपटू अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ क्रिकेटपटूंसह १० जणांवर गुन्हा दाखल.
लातूर: लातूर शहरात एका लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित लॉजवर छापेमारी केली. यावेळी पोलिसांना लॉजमध्ये ४ क्रिकेटपटू अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ क्रिकेटपटूंसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हा अश्लील प्रकार लातूर शहरातील आनंद लॉजवर सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी पश्चिम बंगालच्या २ तरुणींची सुटका केली. या कारवाईत १० जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील ४ संशयित हे धाराशिव जिल्ह्यातील क्रिकेटपटू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माहिती अशी की, मंगळवारी (२० मे) रात्री उशिरा पोलिसांनी संबंधित लॉजवर धाड टाकली. या कारवाईत २ तरुणींची सुटका करण्यात आली. धाडीत धाराशिव येथील क्रिकेटर सौरभ बिराजदार (२५, रा. जिजामाता नगर, ता. तुळजापूर), समर्थ भोसले (२१, व्यवसाय पुजारी, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर), समर्थ कवडे (२२ रा. तुळजापूर), विश्वजीत शिंदे (१९, रा. शुक्रवार पेठ, ता. तुळजापूर), अमोल काळुंके (२०), संतोष तळेकर (३०), अजय कांबळे (४० तिघे रा.लातूर) अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर संशयित किशोर तळेकर, श्याम तळेकर, शाहू तळेकर (सर्व रा. म्हाडा कॉलनी, लातूर) हे फरार आहेत. पोलिस फरार संशयितांचा शोध घेत आहेत.
Breaking News: prostitution racket bust, 2 young women found in inappropriate situations