साकूर येथून पंजाबराव डख यांनी पावसाबाबत दिली अपडेट, या तारखेपर्यंत पाऊस
Breaking News | Sangamner News: २२ ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली.
संगमनेर: शेतकऱ्यांसाठी सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. २२ ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच संगमनेर तालुका व जिल्ह्यात उद्याही चांगला पाऊस राहील व साकूर परिसरात आज सायंकाळी पाऊसाला सुरुवात होणार असल्याच पंजाबराव डख यांनी सांगितलय. पंजाबराव डख संगमनेर तालुक्यातील साकूर येथील एका कार्यक्रमात आले असता त्यांनी हा अंदाज वर्तविलाय.
डख पुढे म्हणाले की, या वर्षी पाऊस चांगला राहील. परंतु पुढील वर्षी पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतुचक्र हे 22 दिवसांनी पुढे ढकलेले गेले आहे. यापुढे दरवर्षी पावसाळा हा 7 जुन ऐवजी 29 जुन पासुन सुरु होईल. तसेच यावर्षी पावसाळा हा 20 ऑक्टोबर पर्यंत राहणार असुन 2 नोव्हेंबर पासुन थंडी पडायला सुरुवात होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
Breaking News: Punjabrao Dakh gave an update about the rain from Sakur, rain