अहिल्यानगर: हुक्का पार्लरवर छापा; नशेत तर्रर्र झालेले अठरा जण सापडले
Breaking news | Ahilyanagar: हॉटेल फूडलँड येथे नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून नशेत तर्रर्र असलेल्या अठरा ग्राहकांसह हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेतले.
अहिल्यानगर: नगर-दौंड रोडवरील हॉटेल फूडलँड येथे नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून नशेत तर्रर्र असलेल्या अठरा ग्राहकांसह हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेतले.
शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचे मालक सतीश किसनराव लोटके, हॉटेलचा व्यवस्थापक अरुण बाबासाहेब ढमढेरे, यांच्यासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अठरा जणांमध्ये दोन तरुणींचाही समावेश आहे. या हॉटेलमध्ये बंद दाराआड हुक्का पार्लर आणि दारू विक्री सुरू होती. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना संशय आल्याने हॉटेलची तपासणी केली तेव्हा आतमध्ये बेधुंद पार्टी रंगली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अनेक तरूण हे नगर शहरातील उच्चभ्रू घरातील आहेत.
कोरोनाच्या काळात सध्या पाच वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी आहे. हॉटेल मालक असलेला हा नाट्यकलावंत बहाल करत असलेला ‘एकच प्याला’ पिण्यासाठी आणि हुकक्याचा कश ओढण्यासाठी येथे रोजच मोठी गर्दी असायची. पोलिसांच्या कारवाईमुळे मात्र या हॉटेलमधील अवैद्य व्यवसायाचा भंडाफोड झाला आहे.
Breaking News: Raid on hookah parlor; Eighteen people found intoxicated