Home अहिल्यानगर शिर्डीतील हॉटेलमध्ये सुरू असणार्‍या वेश्या व्यवसायावर छापा

शिर्डीतील हॉटेलमध्ये सुरू असणार्‍या वेश्या व्यवसायावर छापा

Breaking News | Shirdi Raid: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती. हॉटेलमध्ये दोन पिडित महिला मिळून आल्या.

Raid on prostitution business running in a hotel in Shirdi

श्रीरामपूर: शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती काल मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना सदर प्रकरणी पडताळणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायासंबंधाने खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याबाबतची खात्री पटली. त्या अनुषंगाने सविस्तर पंचनामा करण्यात आला. सदर हॉटेलमध्ये दोन पिडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आले आहे.

वेश्या व्यवसायावर उपजीविका करणारे हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून सुमारे 32 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करत आहे.

Breaking News: Raid on prostitution business running in a hotel in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here