Home अहिल्यानगर अहिल्यानगर: लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा

अहिल्यानगर: लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा

Breaking News | Ahilyanagar Prostitution: रस्त्यावरील कृष्णा लॉजवर छापा टाकून तेथे चालू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला. या कारवाईत तिघे जण ताब्यात घेतले असून एका महिलेची सुटका.

Raid on the ongoing Prostitution canteen at the lodge

अहिल्यानगर:  कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बुरूडगाव रस्त्यावरील कृष्णा लॉजवर छापा टाकून तेथे चालू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला. या कारवाईत तिघे जण ताब्यात घेतले असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

रविवारी (दि.17) सायंकाळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड, अंमलदार निता अडसरे, विशाल दळवी, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, संकेत धिवर, सचिन लोळगे, प्रतिभा नागरे यांचे पथक तयार करण्यात आले. बातमीदाराच्या माहितीनुसार गणेश ससाणे (रा. ओम कॉलनी, नगर) हा महिलांकडून देहव्यापार करवून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छाप्याचे नियोजन करण्यात आले.

या कारवाईत पंचनामा करून एका अंमलदाराला बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांनी लॉजमध्ये जाऊन ससाणे याला 500 रूपयांची नोट देत महिला मागवली. त्यानंतर ठरलेल्या इशार्‍याने पोलीस पथकाने पंचांसह कृष्णा लॉजमध्ये प्रवेश केला. लॉजच्या काऊंटरवर बसलेला इसम गणेश ससाणे असल्याचे स्पष्ट झाले. त्याने खोलीत महिला व ग्राहक असल्याचे कबूल केले. पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता बनावट ग्राहक अंमलदार यांच्यासोबत पश्चिम बंगाल येथील महिला आढळून आली.

महिलेच्या चौकशीतून ससाणे याचा साथीदार कुमार शामलाल नारंग व महेंद्र शामलाल नारंग हे ग्राहकांना महिलांकडे पाठवण्याचे काम करीत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी गणेश ससाणे (वय 42, सारसनगर, नगर), कुमार नारंग (वय 40) व महेंद्र शामलाल नारंग (दोघे, रा. स्टेशन रस्ता, बेल्हेश्वर कॉलनी, आगरकर मळा, अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Breaking News: Raid on the ongoing Prostitution canteen at the lodge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here