भंडारदरा, मुळा पाणलोटात पावसाचा जोर वाढला
Breaking News | Bhandardara: दोन तीन दिवसांच्या काहीशा विश्रातीनंतर उत्तर नगर जिल्ह्याला लाभदायी असलेल्या भंडारदरा आणि निळवंडे पाणलोटात पावसाने काल सोमवारी जोर पकडल्याने डोंगरदर्यांवरील धबधबे पुन्हा सक्रिय.
भंडारदरा: दोन तीन दिवसांच्या काहीशा विश्रातीनंतर उत्तर नगर जिल्ह्याला लाभदायी असलेल्या भंडारदरा आणि निळवंडे पाणलोटात पावसाने काल सोमवारी जोर पकडल्याने डोंगरदर्यांवरील धबधबे पुन्हा सक्रिय झाले आहे. सततच्या पावसामुळे पाणलोटातील सौंदर्य खुलले असून ते पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 8015 दलघफू (72.61टक्के) झाला होता. या धरणातून विसर्ग 840 क्युसेस आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा 7067 दलघफू (84.86 टक्के) झाला होता. या धरणातून नदीत 300 क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. वाकी तलाव तुडूंब असून 198 क्युसेसने विसर्ग सुरू आहे.
पाणलोटात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याने कोकणकडा, कळसूबाई शिखर धुक्याने झाकाळून गेले आहे. पाणलोटातील वातावरणात कमालीचा गारठा वाढला आहे.
दरम्यान, कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई, कोतूळ येथे काल सोमवारी पावसाचा काहीसा जोर होता. दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग काल सकाळी 1000 क्युसेस होता. तो सायंकाळी 2247 क्युसेसपर्यंत वाढला होता.
Breaking News: Rain intensity increases in Bhandardara, Mula