Home महाराष्ट्र तीन दिवस पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान

तीन दिवस पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान

Maharashtra weather update rain: विदर्भात येत्या तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

Rain warning for three days, know the weather in your area

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. विशेषतः विदर्भात येत्या तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतही 11 ते 13 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुणे येथील हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांच्या माहितीनुसार, विदर्भातील उष्णतेची लाट काहीशी ओसरली असून पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पुढील 72 तास हवामानात बदल दिसून येईल. कोकणात देखील हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. पुणे शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहील. तर नाशिकमध्ये तापमानात दररोज 1 अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: Rain warning for three days, know the weather in your area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here