संगमनेर तालुक्यात महसूलने ४० ब्रास वाळूसाठा पकडला
Breaking News | Sangamner: सुमारास छापा टाकत ४० ब्रास वाळूसाठ्यासह दोन वाहने असा एकूण ५ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संगमनेर: शहराजवळील खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात अवैधरित्या सुरू असणाऱ्या वाळू उपशावर महसूलच्या पथकाने बुधव-ारी (दि.११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकत ४० ब्रास वाळूसाठ्यासह दोन वाहने असा एकूण ५ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांवर संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की तह सीलदार धीरज मांजरे यांनी खांडगाव शिवारात सुरू असलेल्या वाळू उपश ावर कारवाई करण्याबाबत ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी प्रवीण शश ीराव डहाके व एम. टी. रहाणे यांना आदेश दिले. त्यानुसार ते कारवाईसाठी गेले असता सदर ठिकाणी एक पिअकप वाहन आढळून आले. याबाबत चालक निकुंज सुधीर ढोले (वय ३७) यास विचारपूस केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परव ाना मिळून आला नाही. यावेळी पिकअपमध्ये चोरुन अर्धा ब्रास वाळू घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावर पथकाने वाळू चोरी कोठून केली ती जागा दाखविण्यास त्यास सांगितले असता तेथे आणखी वाळूसाठा दिसून आला.
सदर ठिकाणी तब्बल ४० ब्रास वाळूसाठा दिसून आला. हा साठा कोणासाठी केला असे चालक ढोले यास विचारले असता त्याने तीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने शरद कारभारी गुंजाळ, गणेश बालोडे, सुनील बोऱ्हाडे, बबलु सातपुते व लहानू बालोडे यांच्यासह चोरुन विक्री करण्याच्या उद्देशाने केला असल्याचे सांगितले. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन निकुंज ढोले हा पळून गेला. या कारवाईत पथकाने २ लाख ५० हजार रुपयांची ब्रास वाळू आणि २ लाख ८० हजार रुपयांची ४० ब्रास वाळू साठा केलेली असा एकूण ५ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रवीण डहाके यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोहेकॉ. डुंबरे या करत आहे.
Breaking News: Revenue seizes 40 tonnes of sand in Sangamner