Home संगमनेर संगमनेर: टेम्पोची धडक; दुचाकीस्वार ठार

संगमनेर: टेम्पोची धडक; दुचाकीस्वार ठार

Breaking News | Sangamner Accident: आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.

Sangamner Accident Tempo hits Bike rider killed

घारगाव : आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी (दि. ७) सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील माहुली परिसरात घडली.

सचिन कचरु कानडे (रा. वाघापूर, ता. संगमनेर) असे मयत दुचाकीस्वराचे नाव आहे. सचिन कानडे दुचाकीवरून पत्नी आणि मुलगा यांना घेऊन संगमनेरकडून चाकणच्या दिशेने नातेवाइकांकडे जात होता. अपघातात पत्नी आणि मुलगा किरकोळ जखमी झाले असून, त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

Breaking News: Sangamner Accident Tempo hits Bike rider killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here