Home संगमनेर संगमनेर:  ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

संगमनेर:  ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Breaking News | Sangamner Accident: जुन्या पुणे – नाशिक महामार्गावर घुलेवाडी परिसरात ट्रकच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू.

Sangamner Accident Two killed in truck collision1

संगमनेर:  शहरातून जाणार्‍या जुन्या पुणे – नाशिक महामार्गावर घुलेवाडी परिसरात ट्रकच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) दुपारी घडली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घुलेवाडी परिसरातील साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर नाशिकहून पुणेच्या दिशेने जाणार्‍या ट्रकच्या धडकेत महेंद्र दिनकर गायकवाड (वय 46) व भाऊसाहेब पांडुरंग निघुते (वय 53, दोघेही रा. घुलेवाडी) या दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला.

या घटनेची माहिती मिळताच शहराचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शहरातील खासगी रुग्णालयात दोघांना हलवले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मयत असल्याचे घोषित केले. त्यानंतर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेचा शहर पोलीस पुढील तपास करत आहे.

Breaking News: Sangamner Accident Two killed in truck collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here