संगमनेर: सुवर्णा खताळ यांच्या अर्जावर कायदेशीर आक्षेप? वैधतेवर प्रश्नचिन्ह
Breaking News | Sangamner Election: दुहेरी मतदार नोंदणी बाबत आक्षेप असल्यामुळे उमेदवारी अर्जाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

संगमनेर – संगमनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा विठ्ठल रहाणे ऊर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार सुषमा तवरेज यांनी कायदेशीर आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान हा अर्ज अवैध ठरवावा, अशी मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. दुहेरी मतदार नोंदणी बाबत आक्षेप असल्यामुळे उमेदवारी अर्जाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबीकडे शहराचे लक्ष लागले आहे.
संगमनेर नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा, प्रांताधिकारी अरुण मुंडे यांच्याकडे तवरेज यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुवर्णा विठ्ठल रहाणे ऊर्फ सुवर्णा संदीप खताळ यांनी, नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र
खताळ यांचे नाव एकाचवेळी दोन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत समाविष्ट आहे. रहाणे ऊर्फ खताळ यांच्या नावाची मतदार नोंदणी संगमनेर नगरपालिका मतदार यादीतील (भाग क्र. १५७अनुक्रमांक क्र.३३९ एस) अशी तर, दुसरी मतदार नोंदणी घुलेवाडी मतदार यादीतील (भाग क्र.५२ अनुक्रमांक क्र. ३३९) येथे देखील आहे, असा आक्षेप तवरेज यांनी नोंदविला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, कलमांनुसार, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त मतदार यादीत असणे हे कायद्याचे उल्लंघन मानले जाते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तत्काळ दोन्ही मतदार याद्यांची पडताळणी करावी, अशी मागणी तवरेज यांनी केली आहे.
Breaking News: Sangamner Election Legal objection to Suvarna Khatal’s application


















































