संगमनेर: जि. प. गटांसह गणांची अंतिम प्रभागरचना जाहीर, इच्छुकांचा मोर्चेबांधणीचा मार्ग मोकळा
Breaking News | Sangamner: गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे.
संगमनेर: गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संगमनेर तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट आणि अठरा गणांसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यास विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे इच्छुकांना मोर्चेबांधणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत कोणताही बदल न होता विभागीय आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली आहे. त्यामुळे समनापूर गटात निमोण व समनापूर गण, तळेगाव गटात तळेगाव व वडगाव पान गण, आश्वी बुद्रुक गटात आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द गण, जोर्वे गटात जोर्वे व अंभोरे गण, घुलेवाडी गटात घुलेवाडी व
गुंजाळवाडी गण, धांदरफळ बुद्रुक गटात राजापूर व धांदरफळ बुद्रुक गण, संगमनेर खुर्द गटात संगमनेर खुर्द व चंदनापुरी गण, बोटा गटात खंदरमाळवाडी व बोटा गण, साकूर गटात पिंपळगाव देपा व साकूर गण यांचा समावेश आहे. यामुळे आता इच्छुक उमेदवार आपापल्या गटात व गणात तयारीसाठी कामाला लागणार आहे. मात्र, पक्षनेतृत्व कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Breaking News: Sangamner Z. P. Final ward structure of the groups and the cadres announced