पोट साफ होत नाही म्हणून केली सोनोग्राफी; अल्पवयीन मुलगी गर्भवती, बापानेच शरीराचे लचके तोडले
Breaking News | Nashik Crime: सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार झाले त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्याच्या घटनेने खळबळ उडाली.
नाशिक : नाशिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार झाले त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे, नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अतिसंवेदनशील गुन्ह्यात वडिलांचा DNA तपासल्यानंतर प्रकार उघडकीस आला आहे. मुळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर येथील राहणाऱ्या चाळीस वर्षीय बापाकडून त्याच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची किळसवाणी घटना उघडकीस आली आहे.
सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिची तपासणी केली असता ती मुलगी आठ आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली, घटनेचे गांभीर्य ओळखून गंगापूर पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. सखोल तपासणी सुरू केली असता शंभरपेक्षा जास्त संबंधित लोकांची चौकशी केली. मात्र पीडित मुलीची आई गेल्या दीड महिन्यापासून घरी नसल्याची माहिती समोर आली तर, वडील दिवसभर कामावर असत आणि रात्री उशिरा घरी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अतिसंवेदनशील प्रकरणात वडिलांचा DNA तपासल्यानंतर मुलीवर तिच्या पित्याकडूनच अतिप्रसंग झाल्याने मुलगी आठ आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गंगापूर पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र ह्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
माहिती अशी की, एका परप्रांतीय कुटुंबातील सतरा वर्षीय मुलीला महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी तिच्या आईने दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार तिने सांगितली. यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती मुलगी सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर पोलिसांनी दाखल होत पीडित मुलगी व तिच्या आईसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र या मायलेकींसह तिच्या वडिलांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिस पथकांनी पीडित मुलगी, व गर्भाचे डीएनए नमुने संकलित करत तपासणीला पाठविले.
पीडित मुलगी ही नाशिक येथे पित्यासोबत राहत होती, तर तिची आई ही वारंवार तिच्या मूळगावी जात होती. यामुळे दोन्ही पथकांना सरतेशेवटी पीडितेच्या वडिलांवर संशय आला. पूनम पाटील यांनी तिच्या वडिलांचे डीएनए नमुने संकलित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले. तपासणीमध्ये वडिलांनी पीडितेवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी ‘डीएनए’ नमुने घेतल्यानंतर पीडितेचा बाप हा राहत्या परिसरातून फरार झाला होता. त्याने त्याचा वापरातील मोबाइल हा घरीच ठेवून पळ काढल्याने त्याचे ‘लोकेशन’ शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते. मोतीलाल पाटील यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करत सीबीएस भागात ताब्यात घेतले. या धक्कादायक घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.
Breaking News: Seventeen-year-old minor girl abused by her father