Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहण्यासाठी आलेल्या महिलेसोबत धक्कादायक घटना

अहिल्यानगर: पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहण्यासाठी आलेल्या महिलेसोबत धक्कादायक घटना

Breaking News | Ahilyanagar: गुरुवारपेठ नदी पात्रालगत वस्तीत भावाच्या घराची पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या बहिणीला विजेच्या तारेचा (सर्विस वायरचा) शॉक बसून त्यात तिचा मृत्यू.

Sister dies after being electrocuted by service wire

पाथर्डी: तिसगावमधील गुरुवारपेठ नदी पात्रालगत वस्तीत भावाच्या घराची पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या बहिणीला विजेच्या तारेचा (सर्विस वायरचा) शॉक बसून त्यात तिचा मृत्यू झाला. बुर्‍हाणा सिकंदर शेख (वय-55) रा. इंदिरानगर पाथर्डी असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेदरम्यान त्या तिसगावमध्ये गुरूवारपेठे असलेला आपल्या भाऊ हसन पठाण यांच्या घराची पूराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.

यावेळी खा. निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू होता. घटना घडल्यानंतर सचिन खंडागळे, दिनेश ससाणे यांनी यांनी वीज प्रवाह खंडीत करून मदत कार्य केले. शॉक बसलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी पाथर्डी येथे हलविले होते. तेथे तपासणी अंती मयत घोषित करण्यात आले. घटननेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत अर्धातपास रास्तारोको आंदोलन केले.

Breaking News: Sister dies after being electrocuted by service wire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here