सालगड्याच्या मेहुणीवर शेतात अत्याचार, ‘नवरा-बायकोसारखे राहू’
Breaking News | Latur Crime: शेतातील सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार.
लातूर : शेतातील सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसामध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला लातूरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे. सालगड्याची अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचं तपासणीमध्ये उघड झालं, त्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला.
आरोपी सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून अत्याचार करत होता. तसंच याबाबत कुणाला सांगितलं तर जीवे मारू, अशी धमकीही त्याने अल्पवयीन मुलीला दिली होती. मुलगी गरोदर राहिल्यानंतर नातेवाईकांनी औसा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्याचं लक्षात येताच आरोपी फरार झाला, पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला लातूरमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहुणा हा आरोपीच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता, तसंच पीडित मुलगी बहिणीकडे राहण्यासाठी आली होती. आरोपी मुलीवर नजर ठेवायचा आणि वारंवार शेतातील शेडमध्ये यायचा.
आरोपीने पीडित मुलीला आपण नवरा-बायकोसारखे राहू, असं सांगून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करायचा. तसंच याबाबत बहिण आणि मेहुण्याला सांगितलंच तर जीवे मारू अशी धमकीही द्यायचा. मुलगी गरोदर झाल्यानंतर सहा महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता, पण पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला. यानंतर आरोपीला लातूरमधून ताब्यात आहे. आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
Breaking News: Sister-in-law of Salgad was tabused n the field, ‘Let’s live like husband and wife’