Home महाराष्ट्र अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून

Breaking News | Crime:  अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून.

slitting her throat on suspicion of having an immoral relationship

सांगली : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून निघृण खून केला. काजल प्रशांत एडके (वय 28, रा. शांतिनगर, सांगली. माहेर मलकापूर, जि. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. खुनानंतर संशयित पती प्रशांत एडके (वय 35) पोलिसांत स्वतःहून हजर झाला. सांगलीतील शांतिनगर येथे रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

एडके दाम्पत्यामध्ये काही महिन्यांपासून कौटुंबिक व अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद सुरू होता. रविवारी सकाळी काजल घरातील सर्व कामे आवरून अकराच्या सुमारास विश्रांती घेत होत्या. त्यावेळी प्रशांतही घरीच होता. या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून संशयिताने रागाच्या भरात धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वर्मी वार केले. यामध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर पतीने थेट शहर पोलिस ठाणे गाठले. घटना समजल्यावर पोलिसही थक्क झाले. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत काजलचा अतिरक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तो सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलिस उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी भेट दिली.

Breaking  News: slitting her throat on suspicion of having an immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here