अहिल्यानगर: पंचनामे करताना तलाठ्यास सर्पदंश
Breaking News | Ahilyanagar: अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या सर्पदंश तलाठ्यास झाल्याचा प्रकार समोर आला.
खर्डा | अहिल्यानगर: अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या सर्पदंश तलाठ्यास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धनेगाव (ता. जामखेड) शिवारात गुरुवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. आकाश काशिकेदार असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने त्यांना जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दसऱ्यादिवशी काशिकेदार हे धनेगाव शिवारात पंचनामे करीत असताना, गवतात लपलेल्या सापावर त्यांचा पाय पडला. त्यानंतर क्षणार्धात सापाने दंश केला. त्यानंतर काही क्षणांतच काशिकेदार यांना चक्कर आली. सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ धीर देत त्यांना उचलून चारचाकी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. सुहास काळे, संदीप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे व मनोज काळे यांनी जीव वाचवण्यासाठी तत्परतेने मदत केली.
शिंदे यांची रुग्णालयात धाव
घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी खासगी रुग्णालयात धाव घेऊन तलाठी आकाश काशिकेदार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
रुग्णालय प्रशासनाला त्यांनी उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना दिल्या. तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन तलाठी काशिकेदार यांची विचारपूस केली.
Breaking News: Snake bite to Talatha while performing Panchnama