…त्यामुळे तुम्हाला मोर्चे काढण्याची वेळ आली, आमदार खताळ : माजी मंत्री थोरात यांच्या टीकेला उत्तर
Breaking News | Sangamner: तालुक्याच्या विकासाची घड़ी आता चांगल्या पद्धतीने बसत असल्याने ते त्यांना सहन होत नाही. खताळ
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील जनतेने तुमचा पराभव केला आहे, तुमच्या विषयी कोणतीही सहानुभूती आता राहिलेली नाही. तालुक्याच्या विकासाची घडी आता चांगल्या पद्धतीने बसत असल्याने तुम्हाला ते सहन होत नाही. त्यामुळेच मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. परंतु, तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही, अशी टीका आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
माजी मंत्री थोरात यांना धमकी देणारे कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २१) संगमनेर शहरात सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. यावेळी थोरात यांनी आमदार खताळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आमदार खताळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, माजी आमदारांनी काढलेल्या मोर्चाबद्दल मला कोणतेही भाष्य करायचे नाही. त्यांनी
खतपाणी घातल्यामुळेच घुलेवाडी येथील घटनेला राजकीय पार्श्वभूमी मिळाली. कटकारस्थान करून कीर्तनात त्यांच्या स्वीय सहायकानेच गोंधळ घातला. आज भगवे ड्रॉडे घेऊन तुम्ही सहानुभूती मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरला असला तरी सोयीनुसार हिंदुत्ववाद स्वीकारण्याचा तुमचा प्रयत्न जनतेने केव्हाच ओळखला आहे.
यापूर्वी तालुक्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, युतक-युतती यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार घडले त्यावेळी तुमची सद्भावना कुठे गेली होती. सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला विरोध करणारे पत्रक अजूनही जनता विसरलेली नाही. त्यामुळेच अडचणीत आलात की, हिंदुत्ववादी असल्याचे दाखवायचे हे तालुक्यातील जनता कधीही मान्य करणार नाही.
दरम्यान भंडारे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला जात आहे. जिल्हयात विविध ठिकणी हिंदूत्ववादी संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
Breaking News: So it’s time for you to take out rallies, MLA Amol Khatal