Home अहिल्यानगर अहिल्यानगर: शर्यतीत बैलगाडीची धडक बसून प्रेक्षकाचा मृत्यू

अहिल्यानगर: शर्यतीत बैलगाडीची धडक बसून प्रेक्षकाचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीत एका प्रेक्षकाचा बैलगाडीच्या धडकेत मृत्यू झाला.

Spectator dies after being hit by bullock cart during race

अहिल्यानगर:  भिंगार परिसरातील मोरे मळा येथे झालेल्या बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली असून, एका प्रेक्षकाचा बैलगाडीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (29 जुलै) दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास मोरे मळा, भिंगार येथे आलमगीर ते मोरे मळा मार्गावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता पार पडत होती. या शर्यतीदरम्यान एक बैलगाडी तिचा निश्चित मार्ग सोडून प्रेक्षकांच्या गर्दीत घुसली. या अपघातात संजय आसाराम जाधव (वय 55, रा. बोल्हेगाव गावठाण, अहिल्यानगर) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी माहिती घेतली असता सदर बैलगाडा शर्यतीचे आयोजन विनापरवाना करण्यात आले असल्याचे समोर आले. तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षीततेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे लक्ष्यात आले.

म्हणून पोलीस अंमलदार दत्तात्रय मोरे यांच्या फिर्यादीवरून दोन आयोजकांविरोधात बुधवारी (30 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबासाहेब मल्हारी मोरे, गोकुळ अनिल पवार (दोघे रा. मोरे मळा, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

Breaking News: Spectator dies after being hit by bullock cart during race

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here