Breaking News | Akole: वारंघुशी फाट्यावर अकोले-कसारा या प्रवासी बसवर दोन तरुणांनी अचानक दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या ७० प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण.

भंडारदरा भंडारदरा धरणाच्या परिसरातील वारंघुशी फाट्यावर अकोले-कसारा या प्रवासी बसवर दोन तरुणांनी अचानक दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या ७० प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. दगडफेकीनंतर दोन्ही तरुण स्कुटीवरून पळून जात असल्याचे दिसून आले असून ते फरार झाले आहेत.
अकोले येथून सायंकाळी ४ वाजता कसाऱ्यासाठी सुटणाऱ्या बसचे चालक शरद महस्के व वाहक अभिजात सोनवणे नेहमीप्रमाणे प्रवासासाठी निघाले होते. संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास बसने शेंडी गाव मागे सोडल्यानंतर वारंघुशी फाटा येथे दोन नशेबाज तरुण स्कुटीवर आले आणि कोणतेही कारण नसताना प्रवासी बसवर दगडफेक केली. दगड बसच्या समोरील काचेला लागून ती फुटली. त्यावेळी बसमध्ये ७० प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित दगडफेक करणाऱ्यांपैकी एक तरुण यापूर्वीही भात चोरीच्या गुन्ह्यात राजूर पोलिसांच्या ताब्यात होता, अशी माहिती समोर आली आहे. स्कुटीवरील हे दोन्ही तरुण कायम नशेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रवासी बसवर दगडफेक करणाऱ्या दोघांपैकी एकाची ओळख पटली असून दोघेही फरार आहेत. सदर प्रकरणी चालक शरद म्हस्के यांनी राजूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून तपास राजूर पोलिसांकडून सुरू आहे.
Breaking News: Stones pelted at passenger bus in Akole taluka


















































