Home औरंगाबाद राज्यातील या मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक, तरुण ताब्यात, नेमकं कारण काय?

राज्यातील या मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक, तरुण ताब्यात, नेमकं कारण काय?

Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दगडफेक. 

Stones pelted at state's Bahujan Welfare Minister Atul Save's car

Atul Save: राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. पुंडलीकनगर भागात सावे यांचे संपर्क कार्यालय आहे. ते आफिसमध्ये बसलेले असताना बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड मारला. यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पाहिल्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी गाडीकडे धाव घेत दगडफेक करणाऱ्या तरुणाला पकडले.

दरम्यान, दगडफेक करणारा तरुण ज्याचे नाव गणेश सखाराम शेजूळ हा त्याच भागातील हनुमाननगरचा रहिवासी आहे. तो लोकाकंडून पैसे मागत असतो. सावे यांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचारी, पदाधिकारी देखील या तरुणाला पैसे देत होते, अशी माहिती आहे. आजही नेहमी प्रमाणे अतुल सावे संपर्क कार्यालयात बसलेले असताना हा तरुण पैसे मागून गोंधळ घालत होता. तेव्हा त्याला थोडे फार पैसे देऊन तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला.

पण कमी पैसे दिले म्हणून संतापलेल्या गणेशने शेजारी पडलेला दगड उचलला आणि तो सावे यांच्या उभ्या असलेल्या गाडीच्या समोरच्या बाजूच्या काचेवर मारला. (BJP) चालकाच्या शेजारील काच यामुळे फुटली. गाडीवर दगड फेकल्याचे समजताच सावेंचे कार्यकर्ते धावत आले आणि गणेश शेजूळ या तरूणाला पकडले. परंतु तो पैसे मागायला नेहमी येत असल्याने बरेच जण त्याला ओळखत होते. तो मनोरुग्ण असल्याची माहिती आहे.

ही माहिती कळताच पुंडलीकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गणेश शेजूळ याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले. दरम्यान, दगडफेक करणारा तरुण हा मनोरुग्ण असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Breaking News: Stones pelted at state’s Bahujan Welfare Minister Atul Save’s car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here