Home अहिल्यानगर अहिल्यानगर: शाळेच्या बसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

अहिल्यानगर: शाळेच्या बसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

Breaking News | Ahilyanagar: मुलांनी आमच्या मुलीचे फोटो काढले, या संशयावरून दोघांनी शाळेच्या बसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना . दोघांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल.

Students were beaten up by entering a school bus

राहुरी : शाळकरी मुलांनी आमच्या मुलीचे फोटो काढले, या संशयावरून दोघांनी शाळेच्या बसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील लाख येथे घडली.

स्कूल बसचे चालक छगन शिवाजी शेळके एमएच १२ एफसी ९१५९ क्रमांकाच्या बसमधून टाकळीमियाँ परिसरातील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ने आण करतात. दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी छगन शेळके हे बसमध्ये ३५ विद्यार्थी घेऊन परत येत होते. तेव्हा लाख,

दरडगाव शिवारात गणेश काळे व नारायण खाडे या दोघांनी दुचाकी आडवी लावून बस अडवली. नारायण खाडे याने बसचालकाचा मोबाइल हिसकावून घेत शिवीगाळ केली. गणेश काळे हा बसमध्ये चढला. तुम्ही आमच्या मुलीचे फोटो का काढले? असे म्हणत उदय राजभरत वामन, स्वरूप भगवान कोळसे व संचित रमेश निमसे या तीन विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. स्वरूप कोळसे यांचे डोके पकडून बसच्या काचेवर आपटले. यावेळी बस चालक शेळके यांनी विद्यार्थ्यांना सोडविले. त्यानंतर मारहाण करणारे दोघे पसार झाले. घटनेनंतर छगन शिवाजी शेळके यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश काळे व नारायण खाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: Students were beaten up by entering a school bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here