धक्कादायक! मागे ३ वर्षाच्या मुलीला सोडून विवाहितेने संपविले जीवन
Breaking News | Mohol Crime:तुला स्वयंपाक येत नाही, चार चाकी घेण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये, तू नवऱ्याची इज्जत करत नाही अशा त्रासाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने घराच्या चौकटीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या.
मोहोळ : तुला स्वयंपाक येत नाही, चार चाकी घेण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये, तू नवऱ्याची इज्जत करत नाही अशा त्रासाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने घराच्या चौकटीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचोली-काटी ता मोहोळ येथे 3 जून रोजी दुपारी 12.45 वाजता घडली. आशाराणी पवन भोसले असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
दरम्यान आशाराणी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आशा राणीचा नवरा, सासू व सासरा यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पवन भोसले (पती) अलका बलभीम भोसले (सासु) बलभीम चंद्रभान भोसले (सासरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, नागराज बसण्णा डोणे रा रायचूर (कर्नाटक) यांनी चिंचोली औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या पवन भोसले याच्या बरोबर आशा राणीचे लग्न पाच नोव्हेंबर 2019 रोजी रिती रिवाजा प्रमाणे सर्व मानपान करून लावून दिले. आशाची मोठी बहीण ही ही त्याच घरात नांदत आहे. दोन्ही सख्या बहिणी एकाच घरात नांदत असल्याने त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. आशाला तीन वर्षाची लहान मुलगी आहे.
विवाहा नंतर आशा हिस पवन व त्याच्या कुटुंबीयांनी काही दिवस व्यवस्थित नांदविले. मात्र नंतर तुझ्या माहेरहून चार चाकी घेण्यासाठी पैसे घेऊन ये, तुला स्वयंपाक येत नाही, तू नवऱ्याची इज्जत करत नाही अशा प्रकारचा छळ सुरू झाला. मारहाण व शिवीगाळ ही नित्याचीच होती. आशा ही माहेराला गेल्यावर आई-वडिलांना हे गा-हाणे सांगायची. आशा च्या आई-वडिलांनी आमची परिस्थिती नाही, तुम्ही पवनला समजावून सांगा अशी विनवणी पवन च्या आई-वडिलांना करीत होते, मात्र पवन चे आई-वडील पवनचीच बाजु घेऊन तुम्ही हुंडा दिला नाही, मानपान केला नाही, तुम्ही त्याला पैसे द्या असे आशा राणी च्या वडिलांना सुनावले. इतर नातेवाईकांनीही आशाच्या सासू-सासऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व व्यर्थ गेले, छळ वाढतच गेला.
दरम्यान दोन्ही मुली एकाच घरात नांदत आहेत एकी मुळे दुसरीचा संसार उध्वस्त होईल या भीतीपोटी आशाच्या वडिलांनी जावई पवन यास वेळोवेळी शक्य होईल तेवढे पैसे ऑनलाइन पाठविले. तरीही आशाचा त्रास सुरूच होता. आशा वेळोवेळी आई-वडिलांना फोन करून त्रासा बद्दल सांगत होती, मात्र वडील व्यवस्थित संसार करा असे हातबल होऊन सांगत होते.
Breaking News: Suicide Married woman ends life, leaving behind 3-year-old daughter