Home सोलापूर अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

Breaking News | Solapur Suicide: अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Suicide of a 17-year-old minor student studying in class 11

सोलापूर : अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कुलकर्णी तांडा (हत्तूर ता. दक्षिण सोलापूर) येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पूनम बाळू राठोड (वय १७, रा. कुलकर्णी तांडा हत्तुर) असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पूनमचे आई-वडील मजुरी करतात. पूनम अकरावी इयत्तेत शिकत होती. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यावेळी ही घटना घडली.  दुपारी बाराच्या सुमारास घरात कुणी नसताना तिने छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला गळफासातून सोडून वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पण तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही.

Breaking News: Suicide of a 17-year-old minor student studying in class 11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here