तू खालच्या जातीची, अल्पवयीन बॉयफ्रेण्डचा लग्नास नकार, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल
Breaking News |Pune Crime: अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्नासाठी तगादा लावताच संबंधित मुलाने जातीवाचक शिवीगाळ करुन तिला नाकारले. या धक्क्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या पीडित मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप.
पुणे : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्नासाठी तगादा लावताच संबंधित मुलाने जातीवाचक शिवीगाळ करुन तिला नाकारले. या धक्क्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या पीडित मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित आणि आरोपी हे दोघेही अल्पवयीन आहेत., त्यांच्यात 2020 पासून प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. मागील काही महिन्यांपासून पीडित मुलगी आरोपीकडे सतत लग्नाची मागणी करत होती. मात्र, आरोपीकडून सातत्याने टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.
पोलिसात दाखल तक्रारीनुसार, वादाच्या वेळी आरोपीने पीडित मुलीला जातीवाचक शिवीगाळ केली. “तू खालच्या जातीची असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही” असे म्हणत तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. यानंतर पुणे येथील मुलीने नैराश्यात जाऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तसेच बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने विशेष बाल न्यायालयात प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Breaking News: Suicide You are from a lower caste, refusing to marry a young boyfriend