पोलीस दलात खळबळ! निलंबित पोलीस निरीक्षकाने संपविले आयुष्य
Breaking News | Beed Suicide: निलंबित पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई शहरातील भाड्याच्या खोलीत त्यांनी आयुष्य संपवलं.
बीड: बीडच्या पोलीस दलातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. निलंबित पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई शहरातील भाड्याच्या खोलीत त्यांनी आयुष्य संपवलं. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. त्यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे.
सुनील नागरगोजे (वय वर्ष ५७) असे मृत निलंबित पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. नागरगोजे हे मूळ परळी तालुक्यातील नागदरा येथील रहिवासी होते. अनेक वर्षांच्या सेवेनंतर मागील काही महिन्यांपूर्वी ते नोकरीतून बाहेर पडले होते. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथील घर बांधकामासाठी पडल्याने ते प्रशांत नगर येथे भाड्याने राहत होते.
घटनेच्या दिवशी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाड्याच्या घरात कुणीही नसताना सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला.
त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवले. दरम्यान, पोलिसांनी घराची तपासणी केली असता, काही सापडले नाही. नागरगोजे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अंबाजोगाई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. निलंबित पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास करीत आहे.
Breaking News: Suspended police inspector ends his life