Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बस कारच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

अहिल्यानगर: बस कारच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: एसटी बस ची कारला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात.

Teacher dies in bus-car collision

पारनेर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर वाघुंडे बुद्रुक नजीक एसटी बसची कारला जोराची धडक बसल्याने कारचालक मनोहर दादाभाऊ काळोखे (वय ५२, रा. पानोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काळोखे हे सुपे येथील रहिवासी व मूळचे पानोली येथील आहेत ते निघोज येथे जिल्हापरिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते.

एसटी बस व कार ची ही धडक इतकी भीषण होती, की एसटीने कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारमधील गॅस टाकी उडून बाहेर थेट पडली. काळोखे हे त्यांच्या कारने (क्र. एमएच १६-बीएच ३३५१) आपल्या पानोली येथे गावी गेले होते. अहिल्यानगर पुणे महामार्गवरून नगरकडे येत असताना वाघुंडे बुद्रुककडे दुभाजकावरून वळत असतान अहिल्यानगरहून पुण्याकडे भरधाव जाणाऱ्या शिंदखेडा-पुणे बसने (क्र. एमएच २०-बीएल ४१२३) कारला मागून जोराची धडक दिली. या धडकेत काळोखे गंभीर जखमी झाले.

त्यांना जखमी अवस्थेत सुपे येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले नंतर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Breaking News: Teacher dies in bus-car collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here