Home संगमनेर अखेर संगमनेरातील त्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले

अखेर संगमनेरातील त्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले

Breaking News | Sangamner Murder: खुनाचा बनाव करत साक्षात पती हाच पोलिसात हजर होत पत्नीचा खून झाल्याचा बनाव त्याने आपला बचावासाठी केल्याने तालुका पोलिसांनी संशयित म्हणून पतींलाच ताब्यात घेतले होते. 

the mystery of the murder of the woman in Sangamner

संगमनेर: तालुक्यातील जाखुरी येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी दि. 10 ला रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. या खुनाचा बनाव करत साक्षात पती हाच पोलिसात हजर होत पत्नीचा खून झाल्याचा बनाव त्याने आपला बचावासाठी केल्याने तालुका पोलिसांनी संशयित म्हणून पतींलाच ताब्यात घेतले होते. तपासा अंती पोलीसी खाक्या पुढे अखेर आपणच खून केल्याची कबुली या पतीराजाने दिल्याचे तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी सांगितले.

तालुक्यातील नागमठाण येथील 40 वर्षीय महिलेचा संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे खून झाल्याची घटना रविवारी दि. 10 ला मध्यरात्री घडली. संगीता भारत मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने संगमनेर शहरासह तालुका आणि ग्रामीण भागातील जाखुरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, अमित महाजन,, शिवाजी ढमाले, आशिष आरवडे, सचिन उगले, अनिल उगले, सालोमन सातपुते, मंगेश शिंदे , शरद कोकणे, प्रमोद चव्हाण आदि सह जाखुरीत दाखल झाले होते.

याबाबत मयत संगीता भारत मोरे यांचे पती भारत रामभाऊ मोरे ( मूळ नागमठाण,ता. वैजापूर जिल्हा संभाजीनगर, हल्ली रा. मांडे मळा, जाखुरी ता. संगमनेर) यांनीच तालुका पोलिसात खबर दिली. दिलेल्या खबरीत भारत मोरे यांनी असे म्हटले आहे की, पत्नी संगीता, दुसरी पत्नी अलका असे एकत्र राहतो. माझे व्याही सोमनाथ बाबुराव सुरसे, यांचेकडे सध्या कामानिमित्त राहत आहोत. माझी मुलगी शीतल ही तिच्या पतीसह जाखुरी गावात राहते. माझी पहिली पत्नी संगीता ही नागमठाण येथे राहावयास होती. व ती नागमठाण येथुन आठ दिवसापूर्वी आमच्याकडे राहण्याच्या उद्देशाने आली होती.

रविवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मी माझी पहिली पत्नी संगीता, दुसरी पत्नी अलका, व्याही सोमनाथ सुरसे, त्यांची पत्नी मुक्ताबाई, मुलगा नवनाथ, नागमठाणचे भागीनाथ चांगदेव माळी .नागमठाण, वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) हा रात्री आमच्याकडे आल्याने जेवण करून आमच्याकडेच झोपले होते. त्यानंतर सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मी आमच्या घराचे पाठीमागे असलेल्या फॉरेस्ट मध्ये प्रांतविधी साठी गेलो असता त्या ठिकाणी माझी पहिली पत्नी संगीता भारत मोरे, ही मयत अवस्थेत दिसून आली. अखेर असा बनाव भारत मोरै याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्नही झाले. तसेच आपणच खून केल्याची कबुली भारत मोरे यांनी पोलिसांसमोर कबूल केली. घटनेवरुन भारतीय न्याय संहिता 103 कलमांतर्गत भारत मोरे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 16 ऑगस्ट तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. याबाबतचा तपास तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी केला. महिलेची हत्या केलेला संशयीत पतीलाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या व्यक्ती भोवतीच खुनाचे धागे दोरे पोलीस तपासात आढळून आले. मृतदेहाच्या गळ्यावर काही खुणा आढळून आल्या. आरोपीने आपल्या पत्नीचा गळा घोटून तिला जंगलात फेकून दिले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा पती-पत्नी मधील वाद असल्याचे संशय व्यक्त केला.

Breaking News: the mystery of the murder of the woman in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here