Home पुणे आईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाच्या मनात राग, घरातून बाहेर पडला अन्….

आईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाच्या मनात राग, घरातून बाहेर पडला अन्….

Breaking News | Crime : एका तरुणाने आईसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याचे समोर आले. आरोपीने प्राण घातक हल्ला केल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

The son, angry at his mother's immoral relationship, left the house

पुणे : जिल्ह्यातील दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आईसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याचे समोर आले. आरोपीने प्राण घातक हल्ला केल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामुळे दौंड परिसरात खळबळ उडाली.

माहितीनुसार, गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. विशाल थोरात (रा. इंदिरानगर, दौंड) या तरुणाने प्रवीण पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पवार गंभीर जखमी झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला त्याच्या आईचे आणि प्रवीण पवार यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने प्रवीण पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. पवार यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केल्याने जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी विशाल थोरात याला अटक केली आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11:45 वाजता, इंदिरानगरमधील जब्बार शेख यांच्या घरासमोर प्रवीण दत्तात्रय पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपी विशाल उर्फ नण्या किसन थोरात (रा. इंदिरानगर, दौंड) याला राग होता की, त्याच्या आईचे प्रवीण पवार यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत. या कारणावरून त्याने संतापाच्या भरात कोयत्याने पवार यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि हातावर वार केले. या हल्ल्यात प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला.

Breaking News: The son, angry at his mother’s immoral relationship, left the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here