Home नाशिक खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी; अवैध सावकाराचा …..

खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी; अवैध सावकाराचा …..

Breaking News | Nashik Crime: व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी गेलेल्या जेलरोड येथील युवकास अवैध सावकाराने कारमध्ये डांबून अपहरण.

Threatened to kill if ransom not paid Illegal moneylender

नाशिकः व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी गेलेल्या जेलरोड येथील युवकास अवैध सावकाराने कारमध्ये डांबून अपहरण केला. त्यानंतर त्यास एकलहरे येथे नेत गावठी कट्ट्याचा धाक दाखवून साडेतीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात सावकार कैलास मैद, रवी सोळशे व त्यांच्या कारचा चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप भास्कर गायकर (३५, रा. नांदगाव बु. ता. इगतपुरी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी संशयित अवैध सावकार कैलास मैद याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. २२ जून २०२५ रोजी गायकर हे दुपारी दोनला व्याजासह दीड लाखांची रक्कम संशयित सावकार मैद यास देण्यासाठी त्याच्या जेलरोड परिसरातील हरिविहार सोसायटीतील ऑफिसमध्ये गेले होते.

त्यावेळी संशयित मैद व त्याचा साथीदार सोळशे यांनी गायकर यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्या कारमध्ये बळजबरीने बसवित एकलहरे परिसरातील राख असलेल्या परिसरात नेले. त्याठिकाणी नेल्यानंतर संशयितांनी व्याजासह दीड लाखांच्या रकमे व्यतिरिक्त साडेतीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास संशयितांनी गायकर यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि गायकर यांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी गायकर यांनी उपनगर पोलिसात तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे हे करीत आहेत. तर, संशयित मैद याच्याविरोधात उपनगर पोलिसात यापूर्वीच अवैध सावकारीचा गुन्हा दाखल आहे.

Breaking News: Threatened to kill if ransom not paid Illegal moneylender

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here