अहिल्यानगर: लग्न कर नाहीतर परिणाम भोगशील… तरुणीला पिस्तूल दाखवत धमकी
Breaking News Ahilyanagar Crime: एका तरुणीवर लग्न करण्याच्या जबरदस्ती करण्यासाठी तिला धमकावण्याचा प्रकार घडला आहे. विवाह करण्यास नकार दिला तर युवतीला वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी युवकाने दिली.

अहिल्यानगर: शहरात एका तरुणीवर लग्न करण्याच्या जबरदस्ती करण्यासाठी तिला धमकावण्याचा प्रकार घडला आहे. विवाह करण्यास नकार दिला तर युवतीला वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी युवकाने दिली आहे.
अहिल्यानगर शहरात राहणारी ही युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिला या तरुणाने धमकी देताना हातामध्ये पिस्तूल असलेला फोटो दाखवला आणि तिला अजून घाबरवले. हे विकृत काम करणारा तरुण सलग आठ वर्षांपासून तरुणीचा पाठलाग करत असल्याचेही समोर आले आहे. तो सतत तिला वेग-वेगळ्या प्रकारे त्रास देत असत. पिस्तूल देऊन धमकावल्याचा प्रकार घडल्यानंतर तरुणीने त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.
ओमकार ज्ञानेश्वर सुपेकर (रा. वाणीनगर, सावेडी) गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 2017 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. सुरुवातीला त्या दोघांमध्ये मैत्रीच्या नात्याने बोलणे सुरू झाले होते. मात्र 2020 मध्ये आरोपीने युवतीला लग्नाची मागणी घातली. परंतू, तरुणीने त्याला नकार दिला. नकार दिल्यानंतर त्याने संतापून शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर, तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला. पण आरोपी तिला इतरांच्या फोनवरून संपर्क साधत त्रास देत राहिला. नातेवाईकांनी आरोपीच्या पालकांना समजावून सांगितले, पण काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू झाला. 2023 मध्ये तरुणी क्लासला जात असताना आरोपीने तिची दुचाकीची चावी हिसकावून घेत धमकावले होते.
रविवारी (दि. 5) आरोपीने पुन्हा तरुणीला गाठले आणि हातात पिस्तूल घेतलेला स्वतःचा फोटो दाखवत “लग्न कर नाहीतर परिणाम भोगशील” अशी धमकी दिली. या घटनेने तरुणी भयभीत झाली असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Breaking News: Threatening a young woman with a pistol


















































