अहिल्यानगर: लिव्ह-इन संबंधातील वादातून तरूणीला धमक्या
Breaking News | Ahilyanagar Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरूण-तरूणीमध्ये झालेल्या वादातून तरूणीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या.

अहिल्यानगर: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरूण-तरूणीमध्ये झालेल्या वादातून तरूणीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (23 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता, कजबे वस्ती येथे राहत असलेल्या 30 वर्षीय पीडित तरूणीने रविवारी दुपारी फिर्याद दिली आहे. गणेश चितळे (पूर्ण नाव माहिती नाही, वारूळाचा मारूती, नालेगाव, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चितळे याच्यासोबत मागील तीन महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गणेशने फिर्यादीला वारंवार फोन करून शिवीगाळ केली तसेच मी तुला बघून घेईन अशा स्वरूपाची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, पीडितेने घडलेला प्रकार तोफखाना पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गणेश चितळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करीत आहेत.
Breaking News: Threats to a young woman over a dispute over a live-in relationship


















































