बस-दुचाकी अपघातात सख्ख्या भावांसह तीन ठार
Breaking News | Nashik Accident: आगाराची एसटी बस आणि दुचाकी यांच्यात सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
सटाणा (जि. नाशिक): ताहाराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वनोली फाट्याजवळ वसई आगाराची एसटी बस आणि दुचाकी यांच्यात सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसचालक मारुती साठे (रा. वसई) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सटाणा- कसा झाला अपघात
पोलिसांच्या माहितीनुसार, बस नंदुरबारहून वसईकडे निघाली होती. वीरगावजवळ भंडारपाडे येथील विनंती थांबानजीक ताहाराबादच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीने एसटी बसला जबर धडक दिली.
मृतांची नावे: अपघातात सटाणा
शहरातील गोविंद काळू पवार (५०), विकास ऊर्फ विकी दयाराम माळी (१९) आणि रोशन दयाराम माळी (२०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Breaking News: Three killed, including two brothers, in bus-bike accident