Home अहिल्यानगर नात्याला काळिमा!  तीन अल्पवयीन बहिणींवर नातेवाईकांकडून अत्याचार

नात्याला काळिमा!  तीन अल्पवयीन बहिणींवर नातेवाईकांकडून अत्याचार

Breaking News | Ahilyanagar: तीन अल्पवयीन बहिणींवर तिघा जणांनी सलग पाच वर्षे वेळोवेळी बलात्कार केला.

Three minor sisters abused by relatives

राहुरी: राहुरी तालुक्यातील दवणगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. तीन अल्पवयीन बहिणींवर तिघा जणांनी सलग पाच वर्षे वेळोवेळी बलात्कार केला. यामध्ये एका महिलेने त्यांना मदत केल्याचे समोर आले आहे. रक्षकच भक्षक बनलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेतील दोघे पती-पत्नी काही वर्षापूर्वी विभक्त झाले. त्यांना चार मुली होत्या. एका मुलीचे लग्न झाल्यानंतर आणि दोघे पती पत्नी विभक्त झाल्याने मुलींच्या वडिलांनी त्या तीन अल्पवयीन बहिणींचे संगोपन करण्यासाठी त्यांना राहुरी तालुक्यातील एका नातेवाईकाच्या ताब्यात दिले.

सदर तीन नातेवाईकांनी त्या तीन अल्पवयीन बहिणींच्या मजबूरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर सन 2020 पासून आजपर्यंत पाच वर्षापासून वेळोवेळी अत्याचार करुन जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. यासाठी त्यांना एका महिलेने मदत केल्याचे समोर आले. पिडीत तीन मुलींपैकी एका मुलीने त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडून सदर घटना आपल्या मोठ्या बहिणीला सांगीतली. त्यावेळी मोठ्या बहिणीने आपल्या पिडीत 10 वर्षे, 14 वर्षे, व 16 वर्षीय अल्पवयीन तीन बहिणींना बरोबर घेऊन काल दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी थेट राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिस अधिकार्‍यांना घडलेला प्रकार सांगितला.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पुढील कारवाई सुरु केली. पोलीस उप निरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, सतिश कुर्‍हाडे, गणेश लिपने तसेच नायब तहसीलदार बाचकर आदी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पिडीत मुलींची सुटका केली. पिडीत तीन मुलींच्या मोठ्या बहिणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्या फिर्यादीवरून आरोपी तीन आरोपी पुरु व एक महिला अशा चार जणांवर भा.दं.वि. कलम 376, 376 (2) (एन), 34 सह पोस्को कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने आरोपी बजरंग मुख्य आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. इतर तीन आरोपी पसार झाले असून पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.

Breaking News: Three minor sisters abused by relatives

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here